ईशानला सलामीला पाठवण्याचा निर्णय कोणाचा ? समोर आला मोठा खुलासा

0 336
 नवी मुंबई –    सध्या संपूर्ण जगाचा  लक्ष  लागून असलेल्या टी – २० वर्ल्डकप (T20 World Cup) मध्ये  भारतीय संघाला आपल्या प्रतिष्ठे प्रमाणे कामगिरी करण्यास उपयश आले आहे. भारताने सुपर १२ (Super 12) मध्ये आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली असून दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) ने दहा विकेट ने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) ने आठ विकेटने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघावर चारही बाजूने टीका  होत आहे . (Who decided to send Ishaan to the opener? A big revelation came to the fore)
तर दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारतीय संघाने डावाची सुरुवात करण्याची संधी दिली नाही. त्याचा जागी ईशान किशन (Ishaan Kishan) आणि के. एल. राहुल (K. L. Rahul) ने भारतीय डावाची सुरुवात केली होती. मात्र या निर्णयाचा काहीच उपयोग संघाच्या हितासाठी झाला नाही. परिणामी परत एकदा भारतीय संघ फलंदाजीत बोगस कामगिरीला समोर जावे लागले.  या निर्णयाचा सर्वांचं आश्चर्य वाटले होते. मात्र हा निर्णय का आणि कोणी  घेतला याचा उत्तर स्वतः भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathore) यांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रश्नाचा उत्तर दिला आहे.
Related Posts
1 of 58
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले की, तर झाले असे की, सामना सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार यादवला पाठीची दुखापत झाली, त्यामुळे तो पूर्णपणे फिट नव्हता. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी दिली जाणार होती. आम्हाला माहीत आहे की, तो सलामीवीर फलंदाज म्हणून एक चांगला फलंदाज आहे. हे त्याने मागील काही सामन्यांमध्ये दाखवले आहे. ईशान किशनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापकांनी घेतला होता. या चर्चेत रोहित शर्मा देखील सहभागी होता.

तसेच ते पुढे म्हणाले की, ईशान किशनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवणे हा एक योग्य निर्णय होता. आम्हाला खालच्या फळीत ईशान किशन, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा सारखे डाव्या हाताचे इतके फलंदाज नको आहेत. आमच्याकडे पुरेसे खेळाडू आहेत जे चांगली भूमिका बजावू शकतात आणि त्यांनी यापूर्वीही असे केले आहे. आम्ही याला समस्या म्हणून पाहत नाही. असा उत्तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली, मेंदू व तब्येत तपासून घ्या – श्वेता महाले

आयपीएलमुळे कामगिरीवर परिणाम या प्रश्नाचा उत्तर देत ते म्हणाले तयारी ही नेहमीच चांगली असते. मला वाटते की, आयपीएल तुम्हाला एक चांगले व्यासपीठ तयार करून देते जिथे तुम्ही जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळत असता. आयपीएलनंतर विश्वचषक खेळण्यात मला कोणतीही अडचण दिसून येत नाही. आमच्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे योजना अमलात आणणे आहे. (Who decided to send Ishaan to the opener? A big revelation came to the fore)

 हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: