कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचा पुन्हा इशारा, म्हणाले..

0 236
Comfort! The number of corona in the district has decreased, so many patients are registered today
 मुंबई –   देशातील बहुतेक भागात आता कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रभाव कमी झाला असून अनेक राज्य कोरोना मुक्त झाले आहे मात्र असा असून देखील भारतातून कोरोना विषाणूचा  धोका संपलेला नाही. सध्या तरी    पूर्वीसारखी गंभीर नसून मृत्यूचं प्रमाणही कमी आहे. मात्र तरी देखील ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी रविवारी दिला.
Related Posts
1 of 2,439

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी सरकारना त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर बचाव नियम कमी करण्याचं आवाहन केलंय. जिनेव्हा संस्थेच्या वार्षिक बैठकीचं उद्घाटन करताना त्यांनी याबाबत माहिती दिली. डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस म्हणाले की, कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी न होणं म्हणजे कोरोनाचा परिस्थितीकडे लक्ष न देण्यासारखं आहे. अजूनही कमी उत्पन्न असलेल्या देशांतील एक अब्ज लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही.

 

 

मार्चनंतर अनेक आठवड्यांपासून व्हायरसच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. शिवाय मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. परंतु परिस्थिती सुधारल्यानंतर आणि जगातील 60% लोकांचे लसीकरण झाल्यानंतरही कोविड महामारी सर्वत्र संपलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: