कामगार झोपेत असतानाच अचानक गोडाऊनला लागली आग; ११ जणांचा मृत्यू

0 220
While the workers were asleep, a fire broke out in the godown; 11 killed
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
हैदराबाद –  तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये भीषण आग (fire) hydraलागल्याने  ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर  एक कामगार स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Related Posts
1 of 2,326
 समोर आलेल्या माहितीनुसार १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असतानाच तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली. यावेळी कामगारांकडे तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र शटर बंद होतं असं सेंट्रल झोनचे डीसीपी राजेश चंद्रा यांनी सांगितलं आहे.अग्निशमन दलाला पहाटे ३ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते. “एक कामगार इमारतीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” अशी माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी व्ही आनंद यांनी दिली आहे.

गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले अनेकजण हे स्थलांतरित कामगार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगाराच्या गोडाऊनमध्ये दारुच्या मोकळ्या बाटल्या, पेपर, प्लास्टिक, केबल अशा अनेक गोष्टी होत्या. पहिला माळा दुसऱ्या माळ्यासोबत जोडला होता. पहिल्या माळ्यावर दोन रुम होत्या. सर्व ११ मृतदेह एकमेकांच्या अंगावर पडलेले होते. मृतदेहांची ओळखही पटू शकत नाही इतके जळाले आहेत,असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: