लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्याचा ‘तो’ कर्मचारी ACB च्या जाळ्यात

अहमदनगर – तक्रारदार यांचे चुलते आणि चुलतभाऊ यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशन (Shrigonda Police) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये आरोपी यांचे बाजुने मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय बबन काळे यास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे चुलते आणि चुलतभाऊ यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये आरोपी यांचे बाजुने मदत करण्यासाठी संजय काळे या लोकसेवकाने २० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार २३ मार्च २०२२ रोजी तडजोडी अंती १७ हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने या लोकसेवक विरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. आरोपी लोकसेवक संजय काळे याचे विरुद्ध यापूर्वी २०१७ मध्ये तोफखाना पोलीस स्टेशन नेमणुकीस असताना लाचेचा यशस्वी सापळा कारवाई झालेली आहे.
वरील कारवाई सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक,सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर,पो नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पो अंमलदार वैभव पांढरे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड,चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे यांनी केली आहे.