परमबीर सिंग कुठे आहे ? अटकेपासून वाचण्यासाठी सोडला देश ?

0 212

नवी मुंबई –  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर १०० कोटी (100 crores) रुपयांचे वसुलीचे आरोप करून चर्चेत आलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. परमबीर सिंग यांना मागच्या महिन्यात अनेकदा एनआयए कडून समन्स बजावण्यात आला होता मात्र तरीही परमबीर सिंग एनआयए (NIA) समोर हजर न झाल्याने ते अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे. अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना एनआयए ने समन्स बजावलं होतं.(Where is Parambir Singh? Country released to escape arrest?)

सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रकरण उजेडात आलं होतं तेव्हा सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएने नुकतंच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे.  ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत. खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीला प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र परमबीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून कारवाईची शक्यता लक्षात घेऊन परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात पलायन केल्याची शक्यता आहे.

तिसऱ्या पतीपासून विभक्त होणार ‘ही’ चर्चित अभिनेत्री, जाणून घ्या कारण

ईडीने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक केली. त्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आलं. यावरून देशमुख यांना अटक करण्याची केंद्रीय यंत्रणेची तयारी झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी पाचारण केले; पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नव्हता. म्हणूनच ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस बजाविली.

Related Posts
1 of 1,518

गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.(Where is Parambir Singh? Country released to escape arrest?)

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: