DNA मराठी

लग्न १० दिवसांवर असताना कॅशियरने उचला टोकाचं पाऊल;ऑफिसमधून सगळे जाताच ..

0 273
Shocking! Another model commits suicide, another incident in three days
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 चंद्रपूर –  चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एका २८ वर्षीय तरूणाने कार्यालयातच गळफास घेत (Suicide) जिवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिल वराते (Kapil Varate) असं मृतकाचं नाव आहे. तो गोंडपिपरी नगराच्या मुख्य चौकात असलेल्या महिंद्रा होम फायनान्स (Mahindra Home Finance) कंपनीत रोखपाल (Cashier) म्हणून कार्यरत होता.
Related Posts
1 of 2,452
समोर आलेल्या माहितीनुसार कार्यालयाला सुट्टी असतानाही कंपनीच्या काही कामानिमित्त वराते आणि त्याचे सहकारी  ग्राहक कार्यालयात आले होते.  कामकाज पूर्ण झाल्यानंतर सगळेजण कार्यालयातून निघून गेले. मात्र वराते तिथेच होता. यानंतर त्याने कार्यालयातच गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती कळताच ठाणेदार जिवन राजगूरू, पीएसआय धर्मराज पटले घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी कार्यालयातील दस्तावेज आणि चावी ताब्यात घेतली आहे. कपिल वराते हा कुटुंबातील कर्ता होता. येत्या १९ एप्रिल रोजी त्याचा विवाह (wedding) होणार होता. पण त्याआधीच त्याने जिव त्यागला. त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करीत आहेत.(When the wedding was on 10 days, the cashier took the last step; everyone left the office ..)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: