….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर

0 370
..... When the Congress leaders offered Gadkari to join the Congress

 जयपूर –    भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी आपल्याला मागच्या काळात काँग्रेस ( Congress ) मध्ये प्रवेश करण्याची ऑफर  मिळाली होती असा मोठा खुलासा केला आहे. तसेच या कार्यक्रमात त्यांनी  मुख्यमंत्रीपदावरुन इतरांसह आपल्या पक्षालाही चिमटे काढत जोरदार टोलेबाजी केली.

नितीन गडकरी यावेळी म्हणाले  नागपूरमधील काँग्रेसचे नेते डॉक्टर श्रीकांत माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी १७ हून अधिक विषयांमध्ये पीजी केली आहे. त्यावेळी जेव्हा मी निवडणूक हारलो होतो तेव्हा भाजपाची स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला नितीन तू चांगला आहेस, पण तुझ्या पक्षाचं भवितव्य नाही.. तू काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता. चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

तर मुख्यमंत्री पदावरून टोलेबाजी करत नितीन गडकरी म्हणाले समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही, असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार

पुढे ते म्हणाले की, मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता असं विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेट प्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारलं होतं तेव्हा त्यांनी हा कौशल्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे राजकारण देखील कौशल्य आहे.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

Related Posts
1 of 2,139
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: