अचानकपणे व्हाट्सअप चा सर्व्हर बंद कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच!

0 246

नवी मुंबई –   जगात सर्वात जास्त वापरली जाणारी सोशल मीडिया (Social media) मेसेजिंग अ‌ॅप (Messaging app)  व्हाट्सअप (WhatsApp) चा सर्व्हर (Server) दि. 4 ऑक्टोंबर च्या रात्री 9 नंतर अचानक पणे बंद पडला . यामुळे व्हाट्सअप वापरणारे युजर्सना कुठलाही मेसेज पाठवण्यात अडचणीचा सामना करावा लागत होता.  यावर्षी दुसऱ्यांदा व्हाट्सअप चा सर्व्हर बंद पडला आहे. मात्र हा सर्व्हर बंद का? पडला याचं कारण अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे. मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे व्हाट्सअप चा सर्व्हर बंद पडला होता.

सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाले होते. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स  बंद पडली होती. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटर(Twitter) वर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

Related Posts
1 of 1,677

तर दुसरीकडे फेसबुक (Facebook) आणि मेसेजिंग अ‌ॅप मेसेंजरसुद्धा बंद पडले आहे.  कोणते ही संदेश जात किंवा येत नाहीयेत. याच बरोबर इंस्टाग्राम या लोकप्रिय अ‌ॅपचा देखील सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाला होता.  संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अचानकपणे व्हॉट्सअॅप , फेसबुक आणि इंस्टाग्राम (Instagram) सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाल्याने ट्विटर वर फेसबुक आणि व्हाट्सअप च्या नावाने हॅशटॅग ट्रेंड होत असून युजर्स भन्नाट – भन्नाट मेम्स (Memes) शेअर करत आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या महिलेला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: