6 तास व्हाट्सअँप बंद , झुकरबर्गला एवढा आर्थिक नुकसान, आकडा पाहून व्हाल थक्क

0 591
नवी मुंबई –  दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ पासून जगात सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया (Social media)  मेसेजिंग अप  व्हाट्सअप (WhatsApp) , फेसबुक (Facebook) आणि इंस्टग्राम (Instagram) या अपचा सर्व्हर अचानकपणे बंद झाल्याने जगातील अनेक युजरला मेसेज सेंड करण्यास किंवा रिसिव्ह करण्यास अडचणी येत होते. व्हाट्सअप , फेसबुक आणि इंस्टग्राम या तिन्ही लोकप्रिय अपचा सर्व्हर जवळपास सहा तास ठप्प असल्याने या अपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मार्क झुकरबर्गला तब्बल ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे.  अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. मार्क सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या पेक्षा एका स्थानाने खाली आहे.
Related Posts
1 of 1,547

सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची (Shares) मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आलीय. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये  झुकरबर्ग एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेला .

१३ सप्टेंबर रोजी वॉल स्ट्रीट जर्नलने काही कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहारांसदर्भात एक वृत्तांकन केलेलं. यामधील एका लेखामध्ये खुलासा करण्यात आलेला की फेसबुकला त्यांच्या प्रोडक्टमधील कमतरता ठाऊक आहेत. या कमतरतांमुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याच अहवालामध्ये ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च सदनामध्ये म्हणजेच कॅपिटल हिल्सजवळच्या दंगलीसंदर्भातील चुकीची माहिती या माध्यमावरुन पसरवण्यात आल्याचाही उल्लेख आहे. या खुलाश्यानंतर सरकारी अधिकारीही सतर्क झाले. त्यानंतर सोमवारी ही गुप्त माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचाही खुलासा करण्यात आला. याच कारणामुळे फेसबुकच्या शेअर्समध्ये पडझड दिसून येत आहे.

हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे.

अचानकपणे व्हाट्सअप चा सर्व्हर बंद कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच!

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: