WhatsApp चॅट हिस्ट्री होणार सहज ट्रान्सफर, व्हॉट्सअ‍ॅप आणणार नवीन फिचर

0 157
नवी मुंबई –  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) देशात सर्वात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया अ‍ॅपआहे. व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करून  सहज मित्राबरोबर चॅट करता येते. तर कामासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज सहज रित्या एकमेकांबरोबर शेअर करता येते. मात्र यूजर्सनी  आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम बदलली कि त्यांना त्यांची जुनी चॅट हिस्ट्री गमवावी लागत होती  .  मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजरसाठी एक नवीन फिचर (New Features )आणत आहे कि, ज्या फिचरद्वारे आपल्याला आपली चॅट हिस्ट्री एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सहज ट्रान्सफर करता येणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये आपल्या या फीचरची घोषणा करताना म्हटलं आहे की, “हे अनेक मागण्या आणि सूचनांनंतर बनवलं गेलेलं फिचर आहे. ज्याद्वारे युझरची चॅट हिस्ट्री एका ऑपरेटिंग सिस्टममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये हलवली जाऊ शकते. हे अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि डिव्हाइस निर्मात्यासह यावर प्रचंड कष्ट घेण्यात आले आहेत. आम्ही हे फिचर लवकरच युझर्ससाठी उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहोत ज्यात तुम्ही तुमची चॅट हिस्ट्री iOS वरून Android वर न गमावता ट्रान्सफर करू शकता.
येणाऱ्या पाच दिवसात राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
  सर्वप्रथम ‘या’ युझर्ससाठी होणार उपलब्ध
व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याच्या या प्रक्रियेत तुमचे सर्व व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस मेसेज, फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट असतील. दरम्यान, सुरुवातीला विशेषत: हे फिचर अँड्रॉइड १० किंवा त्यापेक्षा जास्त वापरणाऱ्या सर्व सॅमसंग युझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर, लवकरच हे वैशिष्ट्य सर्व अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध होईल. त्यामार्फत युझरने अगदी आपला फोन जरी बदलला तरी देखील तो त्याच्या सर्व जुन्या चॅट्स एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सहजपणे ट्रान्सफर करू शकतो.
Related Posts
1 of 84

अशी ट्रान्सफर करा WhatsApp चॅट हिस्ट्री

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचं फिचर सुरुवातीला फक्त सॅमसंगसाठीच आणलं गेलं आहे. यासाठी, तुमच्याकडे सॅमसंग स्मार्ट स्विच अ‍ॅप व्हर्जन ३.७.२२.१ किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. यासह, तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप आयओएस देखील अपडेट करावं लागेल.
  • तुमचा सॅमसंग फोनला एका केबलने तुमच्या आयफोनला कनेक्ट करा.
  • आपला डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी सॅमसंग स्मार्ट स्विच अ‍ॅपने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करा.
  • आता तुम्हाला तुमचा आयफोन कॅमेरा वापरून नवीन डिव्हाइसवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितलं जाईल.
  • तुमच्या iPhone वर Start वर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
  • आता तुम्ही तुमचे Samsung डिव्हाइस सेटिंग करणं सुरू ठेवू शकता.
  • सेटअप पूर्ण केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसवर केलेल्या नंबरनेच लॉगिन करा.
  • तिथे पॉप-अप दिसेल, Import बटणावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
  • आता आपल्या सर्व चॅट्स पाहण्यासाठी आपलं नवीन डिव्हाइस अ‍ॅक्टिव्हेट करा.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: