“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?” त्या निर्णयानंतर अभिनेताने केला सवाल

0 404
"What will happen if the names of the shops are written in Marathi?" After that decision, the actor asked a question

मुंबई –  बुधवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये (Marathi language)असावेत असा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यसरकारच्या या निर्णयावर आता अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहे. सरकारच्या या निर्णयावर अभिनेता सुमीत राघवन (Actor Sumit Raghavan) देखील प्रश्न उपस्थित केला आहे. (“What will happen if the names of the shops are written in Marathi?” After that decision, the actor asked a question)

सुमीत राघवनने ट्विट करत सरकारला प्रश्न विचारला आहे. याने खरंच काही मदत होणार आहे का? तर नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखा आहे, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
पुढे तो म्हणतो, मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं? असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून “मराठी अस्मिता” जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय. यावेळी इंग्रजीबद्दल तिरस्कार नसल्याचंही सुमीत म्हणाला. मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो “मराठी” आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची?, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलंय.
Related Posts
1 of 2,210
निर्णय काय?
कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.  (“What will happen if the names of the shops are written in Marathi?” After that decision, the actor asked a question)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: