100 रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?- संजय राऊत

0 213

नवी मुंबई –   देशात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरात आज केंद्र सरकारने (Central Government) ५ आणि १० रुपयांची प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सामान्यनागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या या निर्णयावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi government) टीका केली आहे. भाजप देशात झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. (What kind of mind is there to increase Rs 100 and reduce Rs 5? – Sanjay Raut)

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले  मन मोठं असण्यासाठी आधी मन असावे लागते. आम्हाला पाच रुपयांची नोट दाखवत आहात. किमान २५ रुपये इंधन कपात कराला हवी होती आणि त्यानंतर ५० रुपये. १०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग दरवाढ केली हे सुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का? ज्यांचे मन कठोर आहे तेच पेट्रोल डिझेलचे दर वाढवू शकतात. पेट्रोल पंपावर लोक मोदींकडे बघतात मग मोदी त्यांना आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असा आशिर्वाद देतात. २०२४ साली हेही दिवस जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Related Posts
1 of 1,512

महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार का यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. पण केंद्र सरकार या सर्व गोष्टींना जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून केंद्र सरकारने बेहिशेबी पैसे कमावले आणि आता फक्त पाच रुपये कमी करत आहात. २५-३० रुपये कमी केले असते तर भाजपावाले सांगतात तसे मोठे मन दिसलं असते असे संजय राऊत म्हणाले. (What kind of mind is there to increase Rs 100 and reduce Rs 5? – Sanjay Raut)

शिल्पा शेट्टीच्या लग्नाविषयी शिल्पा समोरच अनिल कपूरने केला धक्कादायक वक्तव्य

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: