देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन, नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

0 559
नवी मुंबई –  एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhade) यांच्या कारवाईवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लावून समीर वानखडे यांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप लावत टीका केली आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत. असा आरोप केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आला आहे. (What is the connection of Devendra Fadnavis with the drug business, serious allegations of Nawab Malik)
 देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतोय असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल चालायचं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय असं सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Related Posts
1 of 1,640

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असं आवाहन फडणवीस यांना केलंय. तसेच फडणवीसांचे या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहेत, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली. भाजपामध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केलाय. मला बोलण्यापासून रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केला. (What is the connection of Devendra Fadnavis with the drug business, serious allegations of Nawab Malik)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार , भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: