केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला ? – नारायण राणे

0 373
What feat did the Union minister do by arresting him? - Narayan Rane
रत्नागिरी-   केंद्रीय मंत्री ( Union ministe) नारायण राणे ( Narayan Rane)  यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray)  यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केली होती नंतर या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता परत एकदा नारायण राणे यांनी आपली जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरी मधून सुरुवात करण्यात आली आहे. ( What feat did the Union minister do by arresting him? – Narayan Rane )
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनासह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.  “त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना..जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही., ” असं टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.

राज्यात पुन्हा लागणार संचारबंदी….?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना 

Related Posts
1 of 2,139
“नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.” असा सज्जड दमही त्यांनी दिला.( What feat did the Union minister do by arresting him? – Narayan Rane )
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: