बैठकीत सोनिया गांधींना उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं? संजय राऊत म्हणतात ……

0 360

नवी मुंबई –   काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांनी काल दि. २० ऑगस्ट रोजी देशातली १८ विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांशी ऑनलाईन स्वरूपात चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. या बैठकीबद्दल आज शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली असून तालिबानच्या मुद्यांवरून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील टीका केली आहे. (What did Uddhav Thackeray say to Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut says ……)

संजय राऊत म्हणाले की  विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार तसेच इतर राज्यातील नेते व मुख्यमंत्री सहभागी झाले होते. सर्वांनी एकजूटीने राहून काम केलं पाहिजे हा सर्वांचा मुद्दा होता. उद्धव ठाकरे यांनीही यावेळी मोठा मुद्दा मांडला. आपण आता सध्या एक आहोत. आता खुर्ची दिसत नाही. पण जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हा आपण एकत्रच राहू. त्यासाठी आपण विश्वास लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी सर्वांना एकीचं महत्त्व पटवून दिलं, असं सांगतानाच या बैठकीत लोकशाही, महागाईसह देशातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली, असं राऊत म्हणाले. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. विरोधकांचं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं संजय राऊत म्हणाले.
 
तर तालिबानच्या मुद्यांवरून बोलताना ते म्हणाले की  कोण काय बोलतो त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाही. पण जेव्हा बाबरी पडण्याचा प्रकार झाला तेव्हा पण सर्व जण पळून गेले होते. आम्ही तेच लोक आहोत. १९९२ साली मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाला त्या दंगलीत देखील शिवसेनेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते?, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.
Related Posts
1 of 1,640

कोणताही हल्ला या ठिकाणी झाला तर लढण्यासाठी आम्हीच असणार? शिवसेना सर्वांना माहीत आहे. प्रखर देखील आहे, हे मोदींना देखील माहीत आहे. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला त्याग आणि बलिदान केले आहे. अनेकांनी देखील बाबरीच्या वेळी देखील शिवसेनेवर बोट दाखवलं होतं. मुंबई जेव्हा दंगल झाली तेव्हा देखील पाकिस्तानचा हात होता. त्या वेळेस रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी दंगेखोरांनाचा सामना केला होता. तेव्हा देखील अनेक जण कडी कुलूप लावून आतमध्ये बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतात, असा हल्लाही त्यांनी चढवला. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हितासाठी झाली आहे आणि प्रत्येक वेळी मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा शिवसेना आजही त्यागासाठी बलिदानासाठी सदैव तत्पर असेल हे सगळ्यांना माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं. (What did Uddhav Thackeray say to Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut says ……)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: