तुमची लायकी काय आहे? संजय राऊत यांचा पडळकर-खोत यांच्यावर हल्लाबोल

0 248

नवी मुंबई – मागच्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या (ST workers) संपात भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देत यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले? असा प्रश्न शिवसेना (Shivsena)  खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. (What are your qualifications? Sanjay Raut’s attack on Padalkar-Khot)

कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत म्हणाले राज्य सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संपातून तोडगा काढण्यासाठी कामगारांना चांगली आर्थिक मदत मिळावी म्हणून पॅकेज जाहीर केलं.

एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबद्दल, राज्य सरकारचा मोठा निर्णय…

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कमीतकमी ५ हजार  रुपये पगारवाढ करणार आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार २४ हजार  रुपयांपर्यंत जाणार आहे. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे, तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय विरोधी पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं नुकसान करत आहेत.

Related Posts
1 of 1,518

त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?

त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. मुंबई ही कामगार-शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाली आहे. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असा विचार आमचं सरकार कधीही करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांना आर्थिक मदत देत आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (What are your qualifications? Sanjay Raut’s attack on Padalkar-Khot)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: