चक्क.. डेव्हिड वॉर्नरने लावला रोहित शर्मावर चोरीचा आरोप , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 337
 नवी मुंबई –   नुकताच दुबई येथे टी – २० वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु झाला असून या वर्ल्डकप साठी प्रत्येक संघ आप आपली नवीन जर्सी(Jersey) चे अनावरण करत आहे. नुकताच भारतीय संघा (Indian team) ची देखील नवीन जर्सी चा अनावरण झाले आहे. या नंतर सोशल मीडिया (Social media) वर ऑस्ट्रेलियन (Australia) संघाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) ने चक्क भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर चोरीचा आरोप लावला आहे. या आरोपांची  सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Well .. David Warner charges Rohit Sharma with theft, find out the whole case)
भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण झाल्यानंतर  अनेक खेळाडूंनी ही जर्सी परिधान करुन नवा लुक सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्ये रोहित शर्मा देखील आहे. नुकतचं रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या हॉटेलच्या खोलीत दिसत आहे. त्याने एका वेगळ्याच स्टाईलमध्ये टीम इंडियाची नवी वर्ल्ड कप जर्सी परिधान केली आहे.
 या व्हिडीओवर वॉर्नरने गंमतीदार कमेंट केली आहे. रोहितच्या पोस्टवर कमेंट करच वॉर्नरने, ‘तू माझ्या टिक टॉक स्टाईलची कॉपी करत आहेस’. असे म्हटले आहे.रोहित शर्माच्या या पोस्टवर, डेव्हिड वॉर्नरने त्याच्यावर त्याच्या टिक-टॉक स्टाईलची कॉपी केल्याचा आरोप केला आहे, तर युजवेंद्र चहल बेडबाबत कमेंट केली आहे.
Related Posts
1 of 65
टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.(Well .. David Warner charges Rohit Sharma with theft, find out the whole case)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: