Weather Alert , राज्यभरात मुसळधार पाऊसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0 381

नवी मुंबई –   शुक्रवारी सायंकाळी  हवामान खात्या (weather department) ने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊसा (Heavy rain) ने हजेरी लावली आहे. राज्यातील मराठवाड्यासह मुंबई, ठाणे , पालघर,   रत्नागिरी, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने मागली दोन ते तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला होता. त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रमधील काही जिल्ह्यांचा समावेश होता. भात कापणीची वेळ असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पाऊस सुरू असून सांगली, कोल्हापूरमध्ये काही भागात सध्या पावसाच्या सरी सुरू आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून शेतकर्‍यांनी शेतमालाची काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी शेतमालाची व्यवस्था करावी असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Related Posts
1 of 1,603
 भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: