तो पर्यंत सोपविण्यात आलेली ही जबाबदारी आपण निष्ठेने निभावणार – हसन मुश्रीफ

0 187

 अहमदनगर –   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) दोन दिवसीय नगरच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण जिल्ह्याचे पालकमंत्री पद  सोडण्याच्या मनस्थितीत असून तशी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली आहे. मात्र जो पर्यंत निर्णय होत नाही, तो पर्यंत सोपविण्यात आलेली ही जबाबदारी आपण निष्ठेने निभावणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. (We will faithfully carry out this responsibility entrusted to him – Hasan Mushrif)

पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले दोन्ही जिल्ह्यांत एका मंत्र्याला काम करणे शक्य नाही त्यामुळे आपण यासंबंधी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली आहे. त्यावर वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे. मात्र, जोपर्यंत निर्णय होत नाही, तो पर्यंत सोपविण्यात आलेली ही जबाबदारी आपण निष्ठेने निभावणार आहे. केवळ मीच नाही, तर आणखी काही मंत्र्यांचा हाच प्रश्न आहे.

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Related Posts
1 of 1,518

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबद्दल बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले निवडणुकांच्या काळात एकेका जिल्ह्याची जबाबदारी असल्यास सोयीचे पडणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शक्य तेथे महाविकास आघाडी होईल. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. जे मंत्री भाजप आणि केंद्र सरकार विरोधात बोलत आहेत त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात आहेत. आपल्यावरही याच कारणातून आरोप होत आहेत. आता मात्र सगळे मिळून भाजपचा हा डाव हाणून पडणार आहोत असे मुश्रीफ म्हणाले.(We will faithfully carry out this responsibility entrusted to him – Hasan Mushrif)

हसन मुश्रीफ यांची जागा कोण घेणार , पाटील की तनपुरे ,कोण होणार पालकमंत्री

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: