
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय मंत्री आहेत. राज्यसभेत खासदार असणारे रामदास आठवले यांची खासदारकीची मुदत २०२६मध्ये संपणार आहे. त्यामुळे अजून किमान तीन वर्षं तरी ते राज्यसभेचे खासदार असतील. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Ahmednagar crime :- अल्पवयीन मुलीचे अपहरण
नुकत्याच ‘जनसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भात केंद्रातील भाजप नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
आता मी दुसऱ्यांदा राज्यसभेत आलो आहे. २०२६ पर्यंत मी खासदार असेन. पण माझी शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मला तशी संधी मिळाली, तर मी शिर्डीतून निवडणूक लढवेन. मी लोकसभेचा माणूस आहे. बघुयात आता काय होतंय. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांना मी प्रस्ताव दिलेला आहे. पण अजून केंद्रातील नेत्यांशी मी बोललेलो नाही. मला संधी मिळाली तर मी तिथून जिंकून येऊ शकतो, असंही रामदास आठवले म्हणाले.