बांधकाम साइटवर चोरी करत असताना वॉचमनने पाहिले अन् ..

0 235
Watchman was spotted stealing from a construction site.
अहमदनगर –   मार्केटयार्ड चौक महात्मा फुले रोड भवानीनगर येथे बांधकाम साईट (construction) चालू असून तेथे मी निलेश चव्हाण रात्री पाळीसाठी वॉचमन म्हणून ड्युटीवर असताना रात्री 1- 30 वाजेच्या सुमारास रितेश पोपट चव्हाण, दुर्गेश रतेश चव्हाण, योगेश रतेश चव्हाण, मीना रतेश चव्हाण हे सर्व राहता भवानीनगर यांनी हे बांधकाम साइटवर सिमेंट व गज चोरी करत असताना मी पाहिले असता त्यांनी माझ्यावर दगडफेक चालू केली व यामध्ये माझी मुलगी खुशी हिला देखील एक दगड लागला. त्यामध्ये ती जखमी झाली.

 

तिला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. वरील नमूद इसमांना मी व माझ्या मुलीने चोरी करताना पाहिलेले असल्यामुळे त्यांना आमच्या विषयी प्रचंड असा राग निर्माण झालेला आहे. व त्यांनी मला व माझ्या मुलीला दगडफेक करुन मारहाण केली व म्हणाले की तुम्ही जर सदर घटनेबाबत कोणास ही काही सांगितले तर आमच्याकडे असलेले भीक मागणारे अपंग मुले यांना मारून टाकून तुमचे नाव पोलिसांना सांगून तुम्हाला सर्वांना जेल मध्ये पाठवू अशा धमक्या देत आहे.

 

Related Posts
1 of 2,357
त्यामुळे त्यांनी केलेल्या चोरीबाबत व मला दिलेल्या धमकी बाबत सखोल चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून कारवाई होत नसल्याने अमरण उपोषण चालू करण्यात आले यावेळी निलेश चव्हाण, कल्पना चव्हाण, रवीना चव्हाण, देविन चव्हाण, प्रकाश चव्हाण, नरेश चव्हाण, सुभाष काळे, मुत्कास काळे, रणवीर चव्हाण, राजू चव्हाण, मनीषा चव्हाण, मोनाली चव्हाण, रिया चव्हाण आदी उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: