वि. का. से. सोसायटी सचिव संघटनेचे माजी जिल्हाउपाध्यक्षांनी बोगस कर्ज माफी लाटून केली शासनाची फसवणूक

0 298

श्रीगोंदा  ;-  भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी टाकळी लोणारचे सचिव सुभाष निवृत्ती निकम यांनी संस्थेत अनियमित  कारभार करून पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबातील सभासदांच्या नावे बोगस कर्ज काढून कर्जमाफीचा लाभ घेतला स्वतःही व्याजात घोळ करून बोगस कर्ज माफी घेतली संस्थेच्या सभासदांच्या व्याज आणि मुद्दल या मध्ये अनियमितता केल्याचे आढळून आले. (Vs. Of To Former District Vice President of Society Secretaries Association cheated the government by waiving bogus debt waiver)

 या संदर्भात आम्ही सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार केली असता निकम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबातील सभासद व स्वतःच्या पत्नीच्या नावे क्षेत्र नसतानाही 60,हजार रुपये कर्ज घेतले तसेच १) सरस्वती नि. निकम ६०,००० रु क्षेत्र ०.०४ आर, २) सुवर्णा सुभाष निकम क्षेत्र नसताना ६०,००० कर्ज ३) सुष्मिता विकास निकम ६०,००० कर्ज क्षेत्र १७ आर, ४) वैशाली दादा निकम ६०,००० कर्ज क्षेत्र १६ आर. तसेच संभाजी ब्रिगेड घ्या तक्रारीवरून निकम यांच्या कुटुंबातील सर्व सभासदांच्या कर्ज खात्याची तपासणी उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी तपासणी केली असता निकम पदाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले स्वतः ही कर्ज रक्कम १,६०,००० व त्याचे प्रत्यक्ष होणारे व्याज रक्कम ५६,४३० रुपये मिळुन २,१६,४३० रुपये होतात मात्र त्यांनी व संस्थेचे लिपिक संभाजी गोरख गलांडे यांनी संगनमत करुन व्याज ३०,८५७ रू.घेऊन १९०८५७ रु कर्ज माफी घेतली.

 तसेच सर्व कुटुंबातील सर्व सभासदांची मिळुन ४१५११० रू.ची नियमबाह्य कर्जमाफी घेतली याचा ठपका ठेवत अहमदनगर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी सभा दिनांक ३/८/२०२१ च्या सभेतील ठराव क्र. ३ नुसार सुभाष निवृत्ती निकम यांना भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी टाकळी लोणार या संस्थेत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेचे पोटनियमबाह्य कामकाज केलेले असून संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणलेली असल्याने त्यांना दिनांक १०/०८/२०२१ पासुन सेवेतुन निलंबित करण्यात आले आहे.

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Related Posts
1 of 1,481
पदाचा गैरवापर करून निकम याने विविध माध्यमातून बेकायदेशीरपणे अमाप माया जमवली असून याबाबत संभाजी ब्रिगेडने निकम यांच्या निलंबनाची मागणी केली होती. निकम यांच्यावर झालेली कारवाई हि प्रातिनिधिक स्वरूपाची असून निकम कुटुंबीयांनी केलेले विविध घोटाळे  करून बेकायदेशीर पणे कर्जमाफी घेऊन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत अशी महिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, व युवराज पळसकर सभासद टाकळी लो वि से सं यांनी दिली. (Vs. Of To Former District Vice President of Society Secretaries Association cheated the government by waiving bogus debt waiver)
 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: