मतदान कार्ड येणार घरी , या पद्धतीचा वापर करून बनवा आपला ऑनलाईन ओळखपत्र

0 991

नवी मुंबई –   पुढच्या वर्षी पाच राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly elections)  पार पडणार आहे. तसेच राज्यात देखील औरंगाबादसह अनेक महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) पार पडणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्य पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे या निवडणुकीला 2024 लोकसभा निवडणुकी (Lok Sabha elections) च्या सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.(Voting cards will come home, create your online ID using this method)

या निवडणुकीत सामान्य नागरिकाला आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम व अटी लागू केले आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती मतदान करू शकते, परंतु त्यासाठी मतदार ओळखपत्र (Voting card) असणे आवश्यक आहे. मात्र हा ओळखपत्र बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन अनेक फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे आता निवडणुक आयोगाने मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत दिली आहे.

या पद्धतीचा वापर करुन एकही रुपया खर्च न करता घरी बसून आपण आपला मतदान ओळखपत्र बनवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचवले जाईल. त्यामुळे मतदार ओळखपत्र ऑनलाइन करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

अर्ज कसा करावा

जर तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही सहजपणे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कोणताही पत्ता पुरावा असणे आवश्यक आहे. तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तुम्ही या लिंकवरून थेट राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://nvsp.in/ वरही जाऊ शकता. येथून तुम्हाला नवीन मतदार म्हणून रजिस्टरवर क्लिक करावे लागेल आणि येथे स्वतःची नोंदणी करून फॉर्म भरावा लागेल.

ही कागदपत्रे हवी आहेत

Related Posts
1 of 1,640

ऑनलाईन मतदार ओळख नोंदणीसाठी तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी, कोणत्याही आधार कार्डची स्कॅन कॉपी, बँक पासबुक, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. या व्यतिरिक्त, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक असेल.

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आयडी कार्ड घरी पोहोचेल

जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या या पोर्टलवरून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला, तर सुमारे 1 महिन्यानंतर मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचते. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुमच्याकडे संगणक असणे देखील आवश्यक नाही, तुम्ही त्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवरून अर्जही करू शकता.(Voting cards will come home, create your online ID using this method)

“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: