
मतदार मतदानाला मुकले….
श्रीरमपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिलला होणार्या निवडणुकीत ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मतदान व उमेदवारीला मुकावे लागणार आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येऊन तेथे प्रशासकांकडे कारभार गेल्याने १३० सदस्य बाजार समिती निवडणूक प्रक्रियेतून वगळले गेले आहेत. श्रीरमपूर येथील मतदार मतदानाला मुकले….
Ahmednagr news: शेतकऱ्यांचे बिल मागितल्याने कारखान्याकडून धमक्या.. पोलिस संरक्षणाची मागणी..!
बाजार समितीसाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र, तालुक्यातील उंदीरगाव, उक्कलगाव, शिरसगाव, निमगावखैरी, भोकर, फत्याबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी माळवाडगाव या ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी माळवाडगाव येथील प्रदीप आसने यांनी केली आहे.
बाजार समितीच्या संचालक ग्रामपंचायत हमाल मापाडी आणि व्यापारी मतदारसंघाच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सेवा संस्था, मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
मात्र, या १३० सदस्यांना मताधिकार नसल्याने निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर आहे, असे आसने यांचे म्हणणे आहे.