
अहमदनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संदर्भात केंद्र सरकारने केलेली कारवाई पाहता ही सूडबुद्धीपेक्षाही भयानक कारवाई आहे. आज देशात जनतेचा आवाज सुद्धा दाबला जातो ही सुद्धा आता काळजी आहे. देशातील लोकशाही संपुष्टात येण्याची ही लक्षणे आहेत, अशी टीका माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पत्रकार परिषदेत केली. येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहराध्यक्ष किरण काळे, मनोज गुंदेचा आदी उपस्थित होते.
Ahmednagar Crime :- गुप्ती व फायटर बाळगणारा जेरबंद…
थोरात म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये आता जो काही कारभार चाललेला आहे तो पाहता अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना संसदेमध्ये बोलू दिले नाही, आज विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेमध्ये जे पंतप्रधान व आदानी यांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले व विविध विषय मांडले त्याला उत्तर न देता थेट त्यांच्यावर कारवाई केली. सूडबुद्धीपेक्षाही अतिशय घातक पद्धतीने हा कारभार देशभरामध्ये सुरू आहे असेही थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.
Ahmednagar news श्रीरामनवमी उत्सवानिमित काढण्यात येणार्या शोभायात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच
अशा या कारवाईमुळे व सध्याची परिस्थिती पाहता देशांमध्ये लोकशाहीचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे लोकशाही राहील की नाही व ती न राहिल्यास आपण कुठे जाऊ हे सांगण्याची आता गरज राहिली नाही, असेही थोरात म्हणाले. आज देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधी पक्ष सुद्धा महत्त्वाची भूमिका हा बजावत असतो. सत्ताधारांचे चुकले तर त्यांना धारेवर धरण्याचं काम विरोधक करत असतात व त्यातूनच लोकशाही बळकट होत असते. मात्र इथे कोणीच उत्तर द्यायचे नाही उलट काँग्रेसच काय सर्व विरोधी पक्षांचे आवाज दाबायचे असा प्रकार देशात सरकारचा सध्या सुरू आहे असेही ते म्हणाले. या सरकारने ईडी सीबीआय यासारखी विविध संस्था वापरून अनेकांना त्रास दिला जे त्यांच्या पक्षात गेले ते स्वच्छ झाले असा टोला त्यांनी यावेळी लागला. एक महिन्यामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही जनतेचे सर्व विषय घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिला.