विसापूर खुले कारागृहाची आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी केली पाहणी..

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – महाराष्ट्र राज्यात महत्त्वाचे समजले जाणारे कारागृह म्हणजे विसापूर खुले कारागृह (Visapur Open Jail). या कारागृहाला नुकतीच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य चे आयुक्त प्रशांत नारनवरे (Prashant Naranware) यांनी भेट दिली. आणि तेथील समस्या जाणून घेतल्या.
Related Posts
यावेळी बोलताना आयुक्त प्रशांत नारनवरे म्हणाले की विसापूर खुले कारागृहाचे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे, कारागृह निरीक्षक व येथील कर्मचारी यांचे नियोजन चांगले असून अशाच प्रकारे त्यांनी कार्य करत राहावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कारागृहातील कैद्यांसाठी कौशल्य शिबीराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कैद्यांसाठी भजन, व्यसनमुक्ती वर आधारीत व्याख्यानमाला चे आयोजन करण्यात येणार आहे जेणेकरून त्यांची मानसिकता चांगली बनेल.
कारागृहात काही अडचणी आहेत का? त्याचबरोबर एखाद्या कैद्याला वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास वैद्यकीय डॉक्टर येतात का ? याचीही विचारपूस आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे महासंचालक श्री. धम्मज्योति गजभिये,कारागृह निरीक्षक, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.