विराट कोहली नाहीतर हे खेळाडू करणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व 

0

नवी मुंबई –  जुलै महिन्यात श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका आणि तीन टी-ट्वेंटी सामन्याची मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) कडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांतून तेसच सोशल मीडियावरून समोर आली आहे. त्याचबरोबर हेड कोच म्हणून भारताच्या माजी कर्णधार आणि महान फलंदाजा पैकी एक असलेला राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी जाणारा हा संघ भारताचा दुय्यम संघ असणार आहे. भारताच्या अ संघ कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 18 जून पासून कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी आणि ओडीआय सामने खेळणार असल्याने  बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन यांचे नेतृत्व खाली आपला दुय्यम संघ पाठवण्याचा निश्चित केला आहे.

पवारांच्या निवास्थानी ठरला कृषी कायद्याबद्दल नवा प्लॅन,  थोरात म्हणाले…

भारताच्या श्रीलंका विरुद्ध असा असणार आहे दौरा

13 जुलै – पहिला एकदिवसीय सामना

16 जुलै – दुसरा एकदिवसीय सामना

18 जुलै – तिसरा एकदिवसीय सामना

Related Posts
1 of 42

21 जुलै – पहिला टी ट्वेंटी सामना

23 जुलै – दुसरा टी ट्वेंटी सामना

25 जुलै – तिसरा टी ट्वेंटी सामना

हे पण पहा – अभिनेत्री शिल्पा शेट्टींनी विकला त्यांचा ५० कोटींचा फ्लॅट

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: