“त्या” वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने विराट कोहलीला सोडावे लागले कर्णधारपद?

0 241
नवी मुंबई –   भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ने मागच्या काही दिवसापूर्वी पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी – २० वर्ल्डकप (T20 World Cup) नंतर आपण भारतीय टी – २० संघाच्या कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने घेतलेल्या या निर्णयानंतर अनेकांना मोठा धक्का बसला असून विराट च्या या निणर्यामागे नेमके कारण काय याबद्दल अनेक चर्चांना उधाण आला आहे.
याच चर्चांमध्ये आता एक माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये कोहलीने संघ सहकाऱ्यांसोबत केलेल्या वर्तवणूकीची तक्रार एका वरिष्ठ खेळाडूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयकडे केली होती. या तक्रारीच्या माध्यमातून भारतीय संघामध्ये फूट पडल्याचे दिसून आल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय संघातील एका वरिष्ठ खेळाडूने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराट कडून संघ सहकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल आक्षेप नोंदवला होता. कोहलीच्या नेतृत्वाबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली होती.
कोहलीने टी २० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असून यामागे त्यावर तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व करत असल्याने आलेला कामाचा ताण कमी करण्याचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने विराटला कर्णधारपदावरहून हटवण्यासाठी नियोजन केलं होतं. विराटकडे संघाचं नेतृत्व आल्यापासून भारतीय संघाला आयसीसी म्हणजेच आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमधील एकही चषक जिंकला आलेला नाही. यावरुन बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी त्याच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली. याच कारणामुळे संघामधून विराटला विरोध होण्यास सुरुवात झाली. ड्रेसिंग रुममध्ये विराटकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या.
Related Posts
1 of 58
काही वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार आर अश्विन अशाच नाराज खेळाडूंपैकी एक होता. मात्र अश्विनच्या नावासंदर्भातील या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून काहीतरी निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानेच विराटने राजीनामा दिला का यासंदर्भातील चर्चाही सुरु झाल्या आहेत. एका वरिष्ठ खेळाडूने कोहलीमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याची तक्रार बीसीसीआयच्या सचिवांकडे केली होती. इंग्लंडविरोधातील मालिकेमध्ये अश्विनला एकाही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. चौथ्या कसोटीमध्ये अश्विन खेळेल असं प्रशिक्षक असणाऱ्या रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं असतानाही अश्विनला संधी देण्यात आली नाही.
हे पण पहा  – हे पण पहा –   यवतमाळ – उमरखेडजवळ वाहून गेली बस
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: