पत्रकार बाळ बोठेला व्हीआयपी ट्रीटमेंट ?

0 11

अहमदनगर – अहमदनगर यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मागच्या ३ महिन्यापासून फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याला आज अखेर तीन महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी टीम मोठे कष्ट करून बाळ बोठेला अटक केली.

मात्र स्थानिक पोलिसांकडून बाळ बोठे आणि त्याच्याबरोबर अटक केलेल्या वकीलाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप  होत आहे.

Related Posts
1 of 1,292

आरोपी बाळ बोठे याला हैदराबाद वरून पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहे.

 

त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या बेड्या त्याच्या हातात नव्हत्या आणि लक्झरी गाडीतून त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या या वागणुकीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे वरिष्ठांनी स्थानिक पोलीस  कारवाई  करणार का ? हे पहावे लागेल.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: