Villagers satisfied with lake recharge- Mohanrao AdhavVillagers satisfied with lake recharge- Mohanrao Adhav

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

श्रीगोंदा :-   श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुल जगताप(Rahul Jagtap) यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध  करून दिल्याने आज गावच्या तलावात पाणी सोडल्याने प्राणी, पक्षी ,जनावरे, जनावरांसोबत शेतकरी, गावकरी महिला, समाधानी झाल्या असे गौरवोद्गार कुकडीचे संचालक मोहनराव आढाव (Mohanrao Adhav) यांनी व्यक्त केले.

‘जल है तो कल है’, हा विचार करून भविष्यातील पाणी महत्त्व लक्षात घेत पाणी म्हणजेच ‘जीवन’ पाणी आडवा पाणी वाचवा पाणी जिरवा पाण्याचा एक एक थेंब जपून वापरा असा मौलिक संदेश आढाव त्यांनी दिला. कुकडी कॅनल गावच्या उत्तरेला आहे तथापि त्या कालव्याच्या अरणगावला काहीच उपयोग होत नव्हता परंतु दर वर्षी उन्हाळ्यात चार महिने ग्रामस्थांना पाणी समस्या भेडसावत होती.  कुकडीला पाणी आलं की कसेबसे एकच महिना गावाला पाणी पुरवत असे व उर्वरित तीन महिने मात्र माणसं, शेळ्या-मेंढ्या, पक्षी, प्राणी सर्वांचा पाण्यासाठी हवालदिल होत असत. परंतु कार्यसम्राट कुकडीचे संचालक मोहनराव आढाव व ग्रामस्थ यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून दहा लाख रुपये देत अरणगावासाठी तलावात पाणी पुनर्भरण यासाठी दहा लाख रुपयांची विशेष तरतूद केली.
 गावच्या पाण्याची समस्या लोकांनी त्यांच्याकडे पोटतिडकीने मांडले नाही गावच्या पाणी प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले गावचे दुर्दैव असे की ‘पाणी उशाला ,कोरड घशाला’ अशी अवस्था होती .सुमारे 35 ते 38 वर्ष होऊन गेली .गावच्या जवळून कुकडी कॅनल वाहत होता आणि गावाला मात्र पिण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी, प्राणी ,पक्ष्यांना तसेच महिलांना आणि ग्रामस्थांना पाणी प्यायला उपलब्ध नव्हते .आज गावचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता आज पर्यंत या महत्त्वाच्या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे कष्टकरी शेतकरी ग्रामस्थ, गुरंढोरं ,शेळ्या मेंढ्या यांचे सर्वांचेच हाल होत होते. परंतु दूरदृष्टीचे संचालक मोहनराव आढाव यांनी ते अचूक ओळखले. नी ग्रामस्थांना सोबत घेऊन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्र आले. त्यांनी ठरवलं की गावच्या तळ्यात पाणी सोडल्यास आपली उन्हाळ्याची चार पाच महिन्यांची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. आत्ता पाण्याची समस्या सुटली आहे.
आज मात्र पाणी तलावात सुटल्याने सर्वांना खूप आनंद झालेला आहे .उद्याची शेतीच्या पाण्याची समस्या जनावरांच्या पाण्याचे पिण्याची समस्या शेतीसोबत गावाच्या पाण्याचे पिण्याची समस्या सुटणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने हेच पुण्यकर्म आहे . राम पखाले , शेतकरी अरणगाव दुमाला
सुमारे तीस-पस्तीस वर्षा पूर्वी गावची पाणी समस्या होती आमदार असताना दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता .आज ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले कारण खरी शेतकऱ्यांची समस्या पाणी असते. आज शेतकऱ्यांच्या सोबत  शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्याने ग्रामस्थासोबत माता-भगिनी युवक व शेतकरी  सुखावला हीच आनंदाची पर्वणी आहे.- माजी आमदार राहुल जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *