गाव तमाशात दंग: चोरट्याने केली शांतता भंग; हजारो रुपयाचा ऐवज लंपास

0 440
Village spectacle: Thieves break peace; Lampas worth thousands of rupees

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी यात्रा निमित्त आणलेल्या तमाश्या मध्ये दंग असताना चोरट्याने भर लोकवस्तीच्या मध्यभागी चोरी करून हजारो रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने आता गावोगावी यात्रा सुरू झाल्या असून काल तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणची सालाबाद प्रमाणे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ या देवस्थानाची यात्रा भरली होती.  यात्रेनिमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून भिका भीमा लोकनाट्य तमाशा आणला होता.  संपूर्ण गावातील नागरिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना गावातील बैरागी बाबा मंदिराजवळ राहणाऱ्या सुभाष घोलप यांच्या घरातील मंडळी उकाडा होत असल्याने दरवाजा उघडा ठेवून महिला मंडळी झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह हजारो रुपयाची रोकड लंपास केली आहे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Related Posts
1 of 2,427
 घटनेचा पंचनामा करून अगुलीमुद्रा तज्ञाना पाचारण करण्यात आले तसेच इकडे तिकडे काही मिळतेय का याची पोलिसांनी कसून चौकशी पाहणी केली मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही त्यामुळे गावातील मंडळी यात्रेच्या तमाशात दंग असताना चोरट्यानी मात्र गावातील शांतता भंग केली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: