विखे व शिंदे यांचा प्रश्न आहे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

विखे व शिंदे यांचा प्रश्न आहे..
कर्जत : जामखेड बाजार समितीत जर आम्ही अर्थकारण, पैशाचा वापर केला असता तर तिथे आमचा सभापती होऊ शकला असता. पण शेवटी लोकं जो निर्णय देतात. तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढे जावं लागतं. त्यामुळे विखे आणि शिंदे काय बोलतात. आतल्या आत काय करतात, तो त्यांचा त्यांचा विषय आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसह विखे शिंदे आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केलं. जामखेड बाजार समितीची होती चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला, जे तिथे असणारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदेराम शिंदे यांनी विखेंबाबत जे वक्तव्य केलं तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे.
अपघातात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू….
रोहित पवार म्हणाले, विखेंचं वलय त्या जिल्ह्यामध्ये नक्की आहे हे एक नक्की आहे. अशा परिस्थितीत मला त्यांची कुठेही मदत झालेली नाही आणि मदत झाली नसेल तर मग रडीचा डाव भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्याकडून का केला जातोय याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.