विजय वडेट्टीवार म्हणतात तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार आहोत

0 212

सोलापूर – राज्यात मराठा आरक्षण आणि आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापला आहे. सत्ताधारी झाली महा विकास आघाडी आणि भाजपामध्ये या प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोप सुरूच आहे.आता याच प्रकरणावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पाया पडायला तयार असल्याचे म्हटले आहे.

सोलापूर मध्ये आयोजित भटक्या विमुक्त ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावामध्ये ते बोलत होते. या मेळावामध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार”असा सवाल करतानाच हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका, असं विजय वड्डेटीवार यावेळी म्हणाले.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

मोदींच्या भेटीसाठी वडेट्टीवारांची बावनकुळेंना साद

ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे.

Related Posts
1 of 1,640

कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही

“३१ ऑगस्ट १९५२ रोजी देशाचे भाग्यविधाते पं. जवाहरलाल नेहरूंनी भटक्या विमुक्त जाती—जमातींवरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटनेला ७० वर्षे लोटली तरीही भटक्या विमुक्तांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. भटक्या विमुक्त जाती—जमातींसह ओबीसी समाजाने प्रस्थापितांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत. हक्क मागणे हा गुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केले. परंतु आज काहीजण महाराज ‘आमचे—तुमचे’ अशा भेदभावाची भाषा करतात. या सत्तेला झुकविण्याची ताकद निर्माण करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही,” या इशाऱ्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

आयपीएल मध्ये दिसणार आठ ऐवजी दहा संघ, बीसीसीआयने जाहीर केले टेंडर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: