१६ कोटी रुपयांचा इंजेक्शन देऊनही ,वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

0 30

पुणे-   १६ कोटी रुपयांचा इंजेक्शन देऊन ही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे (Vedika Shinde) या चिमकुलीचं निधन झालं आहे. वेदिका केवळ आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (Spinal muscular atrophy) म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजार झाला होता. तिच्या आई-वडिलांनी तिला वाचवण्यासाठी १६ कोटी रुपये जमा केले होते. याच पैशांमधून तिला जून महिन्यात १६ कोटींचं इजेक्शन देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर महिन्याभरातच वेदिकाचा मृत्यू झाल्याने पिंपरी-चिंचवड वर शोककळा पसरलीय.(Vedika Shinde dies during treatment despite giving Rs 16 crore injection)

रविवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा अचानक श्वास कोंडलायाने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.वेदिकाला या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं झोलगेन्स्मा नावाचं १६ कोटींचं इंजेक्शन एका खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही या आजाराने वेदिकाचा जीव घेतलाच.

दोन वर्षापासुन मोक्काचे गुन्हयातील फरार आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

हा आजार नेमका आहे तरी काय?

स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी म्हणजेच एसएमए नावाने ओळखला जाणारा हा आजार शरीरात एसएमएन- वन या जनुकांच्या कमतरतेमुळे होतो. या कमतरतेमुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेताना त्रास होतो. हा आजार लहान मुलांना अधिक प्रमाणात आढळून येतो. श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊन त्रास रुग्णाचा मृत्यूही होतो. ब्रिटनमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळून येतं. तिथे दरवर्षी सरासरी ६० बाळांमध्ये हा आजार आढळून येतो.

Related Posts
1 of 1,301

फक्त तीन देशांमध्ये होते इंजेक्शनची निर्मिती

या आजारामध्ये उपचारासाठी देण्यात येणारं जोलगनेस्मा हे इंजेक्शन हे अमेरिका, जर्मनी आणि जापानमध्ये बनतं. ब्रिटनमध्येही या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या ब्रिटनमध्ये याची निर्मिती होत नाही. या इंजेक्शनचा एकच डोस रुग्णाला दिलं जातं.(Vedika Shinde dies during treatment despite giving Rs 16 crore injection)

हे पण पहा – दरड कोसळून १५ जणांचा मूत्यू फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: