राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले मला जे..

0 464
Vasant More's big reaction after Raj Thackeray's visit, told me J ..
प्रतिनिधी- DNA मराठी टीम 
 मुंंबई –  मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा निमित्त आयोजित मेळाव्यामध्ये  घेतलेल्या भूमिकेला पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे ( Vasant More) यांनी विरोध केला होता. यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना पुणे शहर अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related Posts
1 of 2,222
मला जे मांडायचं होतं ते मी राज ठाकरे यांच्याकडे मांडले, मी 100 टक्के समाधानी असून सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. दरम्यान मला आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या ऑफर आता संपल्या. उद्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तर देतील असे मोरे माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले आहेत.

वसंत मोरे म्हणाले की, माझ्या ज्या शंका होत्या त्या आता दुर झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी उद्या ठाण्याच्या सभेमध्ये मला बोलावले आहे. ठाण्याची सभा ही उत्तर सभा असेल त्यामुळे सगळ्या प्रश्नाांची उत्तरे उद्याच्या सभेमध्ये मिळतील असे ठाकरे यांनी मोरे यांना सांगितल्याचे बोलले आहे. मी माझे मुद्दे मांडले आहेत. माझं काय चुक हे बोलणं झालं, मी 100 टक्के समाधानी असून सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. मला आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या ऑफर आता संपल्या असेही मोरे म्हणाले आहेत.

गुढीपाडवा निमित्त आयोजित मेळाव्यामध्ये मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर तुम्हीही हनुमान चालिसेचं पठण करा, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: