
प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील मार्च मध्ये एक मिटिंग झाली आहे. पुढच्या आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे. साधारणत पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात यावर्षी ही निकाल वेळेत लागतील असे मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी व्यक्त केले आहे. त्या अहमदनगरमध्ये शिक्षण अधिवेशनाच्या वेळी बोलत होत्या.
भोंग्यांविषयी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळा सुरु झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या भोंग्यांविषयी निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत त्यांनी शांतीचा संदेश द्यायला हवा देशात एकोपा आणि एकसंघ ठेण्यासाठी प्रयत्न करायला हवे अशाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
तर दुसरीकडे भोंग्यांविषयी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय असल्याचं समजतंय.
दरम्यान आज पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य अंमलबजावणी बाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.