भ्रष्ट व निष्क्रिय कामगार तलाठी कृष्णा गुजर यांची तात्काळ बदली करीत निलंबनाची विविध संघटनांची मागणी..

0 12

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा कामगार तलाठी कृष्णा गुजर हे वारंवार आपल्या कर्तव्यावर गैरहजर असून, त्यांच्यामार्फत या कार्यालयात येणाऱ्या सामान्य माणसाला चांगली वागणूक दिली जात नसल्याचे समोर येत आहे. तलाठी मग्रूरशाही करत असल्याचेही समजते आहे. उपस्थित असलेच तर ते काम चुकारपणा करत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

या अशा मग्रूर, निष्क्रिय, मनमानी कारभार तसेच सामान्यांची पिळवणूक व भू माफियांना मदत करणाऱ्या गाव तलाठी कृष्णा गुजर यांची बदली व चौकशी करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची यावी. याबाबत विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन सादर केले आहे. तात्काळ कारवाई करा. अन्यथा ! आंदोलन करू. असा इशारा देण्यात आला आहे. तालुका शिवसेना प्रमुख बाळसाहेब दुतारे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ॲड. ऋषीकेश गायकवाड, युवक काॅग्रेस तालुकाध्यक्ष डाॅ. गोरख बायकर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल कोहक, राजु मोटे पाटील इत्यादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत गाव कामगार तलाठी कृष्णा गुजर यांचेकडे श्रीगोंदा शहराचा अतिरिक्त तलाठी म्हणून चार्ज होता. त्यानंतर मागील ६ महिन्यापासून त्यांचा चार्ज रेग्युलर करण्यात आला. परंतु, कृष्णा गुजर हा अत्यंत मुजोर पद्धतीचा प्रशासकिय अधिकारी असल्यामुळे, कुठलीही कामे त्यांनी वेळेत केलेली नाहीत.

Related Posts
1 of 1,290

वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा …

श्रीगोंदा शहराच्या तलाठी कार्यालयाचे कामकाज पाहिले तर, खरेदी – विक्रीच्या नोंद तसेच फेरफार नोंदी, बहिवाटीच्या, तक्रारी केसेस, सर्व पंचनामे, महसुल वसुली याबाबत सरळ सरळ निष्क्रिय ठरलेला आहे. सर्व सामान्याकडून अडवणुक करुन, कामे वेळेत न करुन मनमुराद पैसे लाटायचे.. हाच उद्योग या तलाठ्याने श्रीगोंद्यात लावलेला आहे. म्हणजे, पूर्णपणे दप्तर दिरंगाई व शासकीय हमी सेवा कायद्याचा भंग केला आहे. त्यांच्या मार्फत साधारणतः २ वर्षाच्या नोंदी व जनसामान्यांची कामे प्रलंबित आहेत. सर्रास सर्व सामान्यांची पैशासाठी अडवणुक केली जाते. कर्ज बोजाच्या नोंदी देखील तुर्तातुर्त नोंदविल्या जात नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे, श्रीगोंदा येथील काही आजी, माजी कर्मचारी तथा भु माफिया यांचेशी गुजर तलाठी याचे विशिष्ट संबंध असल्याने माझे कुणीही काही वाकडे करु शकत नाही. अश्या पद्धतीने ते अनेकांना सांगताना आढळले आहेत. त्यांनी पाझर तलाव नोंदी वर्षानुवर्षाच्या रद्द करुन, लाखो रुपये घेत जमीन खरेदीखत करुन दिलेले आहेत. तसेच, लोकांचे लाखो, हजारो रुपये घेऊन कामे केलेली नाहीत.

स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची अडवणूक

असे अनेक त्रस्त नागरिक आहेत. पुरावे देण्यासही तयारी आहेत.असे निवेदनात नमूद केले आहे.पुढे त्यांनी सांगितले आहे की, हा मुजोर अधिकारी कधीही तलाठी कार्यालयात उपस्थित नसतो. जुने जाणते लॅण्ड माफिया, महसुल कर्मचाऱ्यांचे घरीच बसुन पैशाची रसद गोळा करतो. सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेवुन गुजर तलाठी यांची ताबडतोब दुसरीकडे बदली करावी व त्याच्या विरुध्द सादर करत असलेल्या पुराव्याच्या आधारे त्याचे निलंबन करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. अन्यथा ! तीव्र आंदोलना ईशारा स्थानिक प्रशासनास दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: