अनुसूचित जमातीतील पारधी व आदिवासी समाजाच्या लोकांसाठी विविध उपाययोजना कराव्यात

0 10

श्रीगोंदा   :-  पारधी म्हटले की गुन्हेगारी चा शिक्का असलेली जमात हे चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र हा त्यांच्यावरील हा गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यात पारधी समाजाच्या लोकांसाठी योजनांची पूर्तता करावी. अशी मागणी नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) च्या वतीने प्रेरणा धेंडे, दादा जाधव, पांडुरंग गडेकर, प्रमोद काळे,विजय रवी पवार,किरण नितनवरे,सागर काळे अशा कार्यकर्त्यांनी दिनांक ५/३/२०२१ रोजी श्रीगोंदे तालुक्याचे नायब तहसीलदार योगिता ढोले  व श्रीगोंदे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले व सदरचे निवेदन  महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या  यांना ही पाठवण्यात आले.

भारतीय राज्यघटनेत आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली असूनही आजही पारधी समाजापर्यंत शासकीय योजना तसेच योजनांची माहिती मिळत नाही आणि विकासाच्या एकविसाव्या शतकातही पुरोगामी महाराष्ट्रात समाजाची ही स्थिती  असणे त्यांना विकासाच्या संधी न मिळणे, हे अत्यंत दुर्दैवी असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व तालुकास्तरावर पारधी समाजाच्या वस्तीवर महा राजस्व अभियानाचे आयोजन करून जातीचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड,निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महा राजस्व अभियान राबविण्यात यावे.

रुणाल जरे यांच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने दिला आपला जाहीर पाठिंबा

महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पारधी बांधवांना राहत्या जागेचे व कसत असलेल्या शेतीचे मालकी हक्काचे पट्टे वन कायद्यांतर्गत मिळवून देणे.पारधी बेडा तिथे अंगणवाडी ही योजना राबविणे, सर्व पारधी बेड्यांचे नामकरण करणे.महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पारधी बेड्याना महसूल गावाचा दर्जा देणे. पारधी समाजातील शेतकऱ्यासाठी आदिवासी पारधी नवीन सिंचन विहीर योजना राबवित वाढीव निधी देण्यात यावे.

Related Posts
1 of 1,301

जो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही  – रुणाल जरे

पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे.पोलीस भरती व वन विभाग भरतीत पारधी समाजाला राखीव जागा उपलब्ध करून देणे.,पारधी समाजाचे जीवन वस्त्यांना व त्यांच्या राहणीमान उंचावण्यासाठी विशेष योजना राबविणे पारधी समाजातील पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना बोलीभाषेतील शिक्षण देण्यात यावे त्यात एक प्रतिनिधी पारधी समाजाचा असावा, मुख्य गाव ते पारधी बेड्या पर्यंत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करणे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे. पारधी समाजातील तरुण शिक्षित व अशिक्षित तरुण युवकांना व्यवसायांच्या विविध संधी उपलब्ध करून देणे या मागण्या चे निवेदन आज देण्यात आले .

श्रीगोंद्यात करोनाचा कहर….. मंडप व्यावसायिकांची कोंडी …..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: