अर्बन बँक प्रकरण- चार डॉक्टरांविरोधात दोषारोपपत्र दाखल

0 247

अहमदनगर –   अर्बन बँकेच्या २२ कोटी ९० लाख रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींविरोधात ५०० पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. निलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे या चार आरोपी डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे.(Urban Bank case: Chargesheet filed against four doctors)

मशिनरी खरेदीसाठी २२ कोटी ९० लाख रूपयांचे कर्ज घेऊन, मशिनरी खरेदी न करता या रकमेची परस्पर विल्हेवाट लावत अर्बन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. शेळके, डॉ. श्रीखंडे, डॉ. सिनारे, डॉ. कवडे, योगेश मालपाणी, जगदीश कदम व गिरीश अग्रवाल आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांनी बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच कर्जाच्या रकमा कुणा-कुणाच्या खात्यात वर्ग करण्यात आल्या, याचीही माहिती घेण्यात आली.

हे पण पहा – पैसे परत मागितल्याच्या रागातून माखिजा यांना मारहाण

Related Posts
1 of 1,487

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात चारही डॉक्टरांना अटकही केली होती. पोलीस तपासात पुरावे गोळा करण्यात आल्यानंतर डॉ. शेळके, डॉ. श्रीखंडे, डॉ. ‘सिनारे व डॉ. कवडे या चार आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरीत तीन आरोपींविरोधातही लवकरच दोषारोप पत्र दाखल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.(Urban Bank case: Chargesheet filed against four doctors)

नाना पटोले म्हणतात मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल….

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: