UP Election:योगी आदित्यनाथबाबत लवकरच अंतिम निर्णय घेणार पंतप्रधान मोदी

0 201

 मुंबई –   पुढच्या महिन्यात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election) मतदान पार पडणार आहे. राज्यात सत्तेत असणारी भाजपाला  मागच्या दोन दिवसात मोठे झटके लागले आहे. राज्यसरकारमध्ये मंत्री असणारे दोन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला आहे. त्याच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. ते अयोध्या मधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.  मात्र समोर आलेल्या माहितीनुसार याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)घेणार आहे.  यासाठी निवडणूक समितीची बैठक या आठवड्यात होऊ शकते.  राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे. (UP Election: PM Modi to take final decision on Yogi Adityanath soon)

आदित्यनाथ सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते परंतु त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व घेईल. योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये (CEC) घेतला जाईल. सीईसी उमेदवारांची नावे अंतिम करतात.  पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी सीईसीची लवकरच बैठक होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे.
Related Posts
1 of 1,635
अयोध्या व्यतिरिक्त, मथुरा आणि गोरखपूर अशा दोन जागा आहेत जिथे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास मुख्यमंत्री उभे केले जाऊ शकतात. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. तेथून ते अनेकदा खासदारही निवडून आले आहेत. यासोबतच ते गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत ही आहेत.पक्षाने त्यांना अयोध्येतून उमेदवारी दिल्यास मोठा संदेश जाईल,  कारण राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे आणि योगी आदित्यनाथ हा पक्षाचा प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा आहे.(UP Election: PM Modi to take final decision on Yogi Adityanath soon)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: