राज्यातील “या ” भागांना पुन्हा झोडपणार अवकाळी पाऊस.., हवामान विभागाने दिला इशारा…

0 596

मुंबई – राज्यातील बहुतेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Untimely rain) शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) व्यक्त केली आहे. राज्यात याआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपीटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अनेक पिके खराब झाले होते.(Untimely rains will hit “these” parts of the state again .., Meteorological Department warned …)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्या आणि परवा गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात गारपीट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तयार झाला आहे. दक्षिण कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आधीच अडीअडचणीच्या सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा संकटा समोर जावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Untimely rains will hit “these” parts of the state again .., Meteorological Department warned …)

Related Posts
1 of 2,066

गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला माजी सरपंचाने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: