Ahmednagar news :- नुकसानग्रस्त भागाला सुनीता गडाख यांची भेट…
अवकाळी पावसाने सगळीकडेच हाहाकार उडवून दिला आहे.

नुकसानग्रस्त भागाला सुनीता गडाख यांची भेट…
नेवासा : अवकाळी पावसाने सगळीकडेच हाहाकार उडवून दिला आहे. या नुकसानग्रस्त भागाला स्थानिकनेते भेट देऊन संबंधितांना आधार देत आहे. चांद्यातील नुकसानग्रस्त भागाला माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट दिली. नुसकानग्रस्त कुटुंबांना त्यांनी मानसिक आधार देत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यात सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बहुंतांश जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.
नेवासे तालुक्यातील चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चांद्यातील रस्तापूर रस्ता, पुंड वस्ती, दरंदले वस्ती, बोरुडे वस्ती अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेेले आहे.
या नुकसानीची माहिती होताच माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट दिली. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन गडाख यांनी दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब दहातोंडे, बाळासाहेब जावळे, बंटी कदम, सचिन जावळे, अजित बागवाले आदी उपस्थित होते.