कोळगाव येथील गायरान क्षेत्रावर अज्ञात व्यक्तीने लावली आग…

0 12
श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील नगर दौंड रस्त्या लगत असलेल्या कोळाई देवी मंदिराच्या माळरानावरील गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे ३ एकर क्षेत्रावरील गवत तसेच लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत कोळगावचे उपसरपंच अमित लगड यांना समजताच त्यांनी तत्काळ हालचाल करत लागलेली आग तरुणांच्या साहाय्याने आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.  श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यालगत असलेल्या कोळाईदेवी मंदिराच्या माळावरील असलेल्या २८ एकर गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने आग लावली .

 

Related Posts
1 of 1,291

१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या

मात्र याबाबत कोळगावचे उपसरपंच अमित लगड यांना समजताच त्यांनी तत्काळ हालचाल करत  लागलेली आग तरुणांच्या साहाय्याने आटोक्यात आणल्याने सुमारे ३ एकर क्षेत्रावरील गवत तसेच लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतिची जमीन असून या याठिकाणी जनावरांसाठी चारा चारण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून माळरानाचा भाग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात ससे, हरिण, तरस, दुर्मिळ पक्षी, वन्यजीव असून या जंगलाला अज्ञात व्यक्तीने आग लागल्यामुळे मोठ्याप्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. ही आग कोळगाव येथील उपसरपंच अमित लगड, संतोष लगड, इथापे मेजर यांच्यासह अनेक तरुणांनी अथक प्रयत्न करून विझविली.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: