केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार अर्थसंकल्प

0 12

नवी दिल्ली –  २९ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अभिभाषणानं  सुरू झालेल्या २०२१ च्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता संसदेत २०२१ साठी बजेट सादर करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन तिसऱ्यांदा आज बजेट सादर करणार आहे. या बजेटमध्ये कोरोना  संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणाला दिलासा मिळतो आणि कोणत्या वस्तू महागणार तर कोणत्या वस्तू स्वस्त होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

पोलीस ठाण्यातील डीबी पथके नावाला,पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

तर मागच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय असणार आहे आणि कोरोनामुळे देशात अनेक तरुण तरुणीचे नोकरी गेले होते यामुळे यंदा या बजेटमध्ये त्यांच्यासाठी  काय असणार ? त्यासाठी सरकार कोणती घोषणा करणार हे पाहावे लागेल.

Related Posts
1 of 1,290

                          अण्णा तुम्ही आंदोलन फक्त काँग्रेस राजवटी मध्येच करणार का ? – शिवसेना 

तर दुसरीकडे ज्यांच्याकडे देशात सध्या नोकऱ्या आहे  अश्या  नोकरदार वर्गाला  इन्कम टॅक्स मध्ये काही सूट मिळणार की नाही हे अवघ्या देशाला आज कळणार आहे . अर्थमंत्री निर्मला सीतारमण पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात  पेपरलेस बजेट सादर करणार आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, काकाने अर्धा किलोमीटर खांद्यावर उचलून आणले रुग्णालयात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: