नाशिकमध्ये मेट्रो येणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा 

0 11

नवी दिल्ली –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करत आहे .  सकाळी ११ वाजता   निर्मला सीतारामन  यांनी संसदेमध्ये आपला तिसरा अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. यावेळी   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी मोठी घोषणा केली आहे.

आपल्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  म्हणाले कि  भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार  आहे. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या भागामध्ये या मेट्रोचं जाळं उभारलं जाणार आहे. अशी घोषणा त्यांनी केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी  यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या विशेष निधीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिक या  शहरांचाही उल्लेख आहे. नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं काम होणार असून नाशिकमध्येही मेट्रो येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. नाशिक मेट्रोसाठी केंद्राने असाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिलाय.
Related Posts
1 of 1,290

भारतामध्ये मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद करत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. निर्मला यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचं काम करण्याच्या दृष्टीने निधी कशापद्धतीने देण्यात येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं निर्मला यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी केली आहे.

 पोलीस ठाण्यातील डीबी पथके नावाला,पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: