
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील डोकेवाडी येथील सिध्देश्वर सेवा संस्थेच्या (Siddheshwar Seva Sanstha) अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गाढवे यांची निवड झाली. तेरा पैकी आठ संचालकाचे पाठबळ असल्यामुळे विरोधी गटाचा निवडणुकीचा हट्ट निव्वळ फार्स ठरला तसेच पदाधिकारी निवडीतील फोडाफोडीच्या राजकारणाला पायबंद घालण्यात सहकार मंडळाला यश आले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष सुनिल बोळगे, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव राऊत यांच्या सहकार मंडळाने तेरा पैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. संस्थेच्या पदाधिकारी निवडीमध्ये विरोधी गटाला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या, परंतु फोडाफोडीच्या राजकारणाचा इतिहास असल्यामुळे सहकार मंडळाने सावध पवित्रा घेऊन पदाधिकारी निवडीतील घोडेबाजाराला पायबंद घालून निवडी निर्विघ्नपणे पार पाडण्यात यश मिळवले.
Related Posts
निवडणुक निर्णय अधिकारी महेंद्र घोडके, सचिव शरद निकम यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षपदासाठी बाळासाहेब खंडू शिंदे आणि जिजाराम डोके तर उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण गाढवे आणि मधुकर मेहेत्रे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. आठ मते मिळवून शिंदे आणि गाढवे विजयी घोषित झाले. उत्तमराव राऊत, सुनिल बोळगे, शहाजी वाकडे, भिमराव छत्तिसे यांनी नवीन पदाधिका-यांचा सत्कार केला. दिपक राऊत, मंगल बोळगे, दादा गव्हाणे, सुनिल शिंदे, बाळू शिंदे, अंबादास चव्हाण, संदिप काळाणे, जालिंदर बोडखे, संदीप डोके, किसन काळे, बाळू डोके, जालिंदर बोळगे, संतोष सोनवणे, चंदू काळे आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिशबाजी केली.
अन् फोडाफोडीच्या राजकारणाला पायबंद..
विरोधी गटाला तेरा पैकी केवळ पाच जागा मिळाल्या होत्या तरीही पदाधिकारी निवडीमध्ये पाठींबा मिळविण्यासाठी बड्या साखर कारखानदार नेत्यांनी लाखोंच्या ‘ऑफर’ बहुमत मिळविलेल्या गटातील संचालकांना दिल्या. सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या केविलवाण्या प्रयत्नांना सामान्य कुटुंबातील संचालकांनी थारा दिला नाही अन् पदाधिकारी निवडीतील फोडाफोडीच्या राजकारणाला पायबंद बसला.