पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीसबोत धक्कादायक कृत्य

पिंपरी चिंचवड – पुणेसह पिंपरी चिंचवड मध्ये मागच्या काही दिवसांपासून महिल्यांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. यातच पुन्हा एकदा एका पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे . एका रिक्षाचालकाने १२ वर्षीय अल्पवयीन (minor girl)समोर हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास एक 12 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात होती. याचदरम्यान एक रिक्षाचालक विरुद्ध दिशेने आला आणि तिला पत्ता विचारू लागला. पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्याने त्या 12 वर्षीय मुलीसमोर हस्तमैथून केले. तर रिक्षाचालकाच्या या कृत्यामुळे मुलगी घाबरली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांकडे (Hinjewadi Police) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन आरोपी रिक्षाचालक सचिन शेंडगेला अटक केली आहे.
Related Posts
पुण्यात रिक्षाचालकाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग
तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातच एका रिक्षाचालकाने 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना बावधन (Bavdhan) परिसरात घडली होती. पीडित मुलगी खासगी शिकवणीहून परत येत होती. त्यावेळी ही घटना घडली. ही 12 वर्षीय पीडित मुलगी तिच्या स्टडी रुममधून बाहेर पडली. यानंतर दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास ती बावधन येथील एलएमडी चौकात आली. यानंतर तिथे एका रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आला. यावेळी त्याने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.