अन् पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे रहाणार गैरहजर

0 164
मुंबई –  देशात सध्या कोरोना विषाणूच्या (Corona virus) रुग्ण संख्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात मागच्या चोवीस तासात तब्बल 02 लाख 47 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380 जणांचा कोरोनाची लागण आल्याने मुत्यू झाला आहे. देशात दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्यामुळे  चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे आज पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सर्व मुख्यमंत्रीसबोत एक बैठक घेणार आहे. ही बैठक संध्याकाळी 04.30 च्या सुमारास सुरु होणार आली आहे. मात्र ही बैठक सुरु होणाऱ्या पूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Uddhav Thackeray will be absent from the meeting convened by the Prime Minister)
आज होणाऱ्या ऑनलाईन बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपस्थित रहाणार नसल्याची माहीती समोर आली आहे. या बैठकीला त्यांच्या जागी राज्याचे आरोग्यमंत्री  राजेश टोपे (Rajesh Tope) उपस्थित रहाणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला का उपस्थित रहणार नाहीत, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.
Related Posts
1 of 1,635

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीदरम्यान महाराष्ट्र सरकार लशींच्या अधिक साठ्यासह अन्य काही गोष्टींची मागणी करणार आहे. 60 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कोव्हॅक्सिन डोसेसची प्रमुख मागणी असून, मोलनुपिराविर औषध, कोविन अ‍ॅपवरच्या स्लॉट्समध्ये बदल, कोविड-19 व्यवस्थापनासाठी निधी, कॉकटेल अँटीबॉडीज या मागण्याही करण्यात येणार आहे.(Uddhav Thackeray will be absent from the meeting convened by the Prime Minister)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: