
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – आज (25 मार्च) सायंकाळी चारच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विधानसभामध्ये (Assembly) बोलणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या (ED) कारवाईवरून राजकीय पारा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपामध्ये (BJP) या कारवाईवरून आरोप – प्रत्यारोप सुरू आहे. त्यामुळे आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे.(Uddhav Thackeray will answer the opposition today; What about the ‘those’ allegations of Fadnavis?)
दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. याच दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही मुख्यमंत्र्याचे पुत्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
तर दुसरीकडेविधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील काल विधानसभामध्ये बोलताना राज्य सरकारवर टीका करत अनेक आरोप केल्याने आज मुख्यमंत्री त्या आरोपांवर काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काल म्हणजेच गुरुवार दिनांक 24 मार्च रोजीही मुख्यमंत्री विधानसभेत भाषणासाठी उभे राहिले होते. पण त्यांनी फक्त महाविकास आघाडीच्या विकासकामांबद्दल माहिती देऊन भाषण आटोपतं घेतले होते .(Uddhav Thackeray will answer the opposition today; What about the ‘those’ allegations of Fadnavis?)