उड्डणापुलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ,विविध संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

0 12
अहमदनगर –  अहमदनगर शहरामध्ये सध्या उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. शक्कर चौकाजवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक असून मार्केट यार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तसेच पोष्ट ऑफिस चौकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असल्याने प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंंबेडकर यांचे नाव या उड्डाणपुलाला द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, सक्कर चौक ते अशोक हॉटेल चौक या ठिकाणी होणार्‍या उड्डाणपुलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. यासाठी रिपल्ब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट) सर्व आंबेडकरी संघटना, ख्रिश्‍चन आघाडी, यांच्या वतीने आम्ही ही मागणी केली आहे. लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन आमची मागणी पुर्ण करावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी पुर्ण न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करु व त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,290
 या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, अमित काळे, अविनाश भोसले, राहुल वैराळ, दिपक गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, सोन्याबापू सुर्यवंशी, शिवराम पाटोळे, सागर कांबळे आदिच्या सह्या आहेत.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: